Pages

Monday, April 4

Words Related to Room and Place:

Words related to room and place:
खोली आणि जागेच्या संबंधित  शब्द:

1. Shed: शेड
A separated building from the house usually for storing garden tools. (सहसा बागेतील साधने ठेवण्यासाठी घरापासून एक वेगळी इमारत.)

2. Loft: माळा
A room or space directly under the roof of a house or other building, used for accommodation or storage. (घर किंवा इतर इमारतीच्या छताखालील एक खोली किंवा जागा जी निवासासाठी किंवा साठविण्यासाठी वापरली जाते.)

3. Attic: पोटमाळा
A space or room inside or partly inside the roof of a building. (इमारतीच्या छप्परच्या आत किंवा अंशतः आतील जागा किंवा खोली)

4. Cellar: तळमजला
A room below ground level in a house, often used for storing wine or coal. (घराच्या जमिनीच्या खालील एक खोली, जी अनेकदा  वाइन किंवा कोळसा साठवण्यासाठी वापरली जाते. )

5. Basement:  तळघर
Room below ground level, with windows, used for living and working. (जमिनीच्या खालील खिडकी असलेली खोली, जी राहण्यासाठी आणि कामासाठी वापरली जाते.)

6. Landing: दोन जिन्यांमधील सपाट जागा
Flat area at the top of a staircase. ( जिन्याच्या सर्वात वरील सपाट जागा )

7. Porch: व्हरांडा:
Covered area before the entrance door. ( प्रवेशाच्या दरवाजासमोरील जागा )

8. Pantry or Larder: अन्नपदार्थ ठेवण्याचे कपाट
A room or large cupboard for storing food. ( अन्न साठवण्यासाठी एक खोली किंवा मोठे कपाट. )

9. Terrace or Patio: टेरेस किंवा फरसंबंधी केलेले घराजवळील अंगण:
Paved area between the house and garden for sitting and eating, etc. ( घर आणि बागेदरम्यानची बसण्याकरता आणि खाण्या इ करता असलेली पक्की जागा )

10. Study Room: अभ्यास खोली:
A room for reading, writing, studying in. ( वाचन, लेखन, अभ्यासासाठी असलेली खोली. )

11. Balcony: बाल्कनी/गच्ची:
An area with a wall or bars around it that is joined to the outside wall of a building on an upper level. ( इमारतीच्या बाहेरील भिंतीस वरील बाजूस जोडली गेलेली भिंत किंवा गज असलेली जागा )

Sunday, April 3

Words Mostly Use in Wedding Ceremony.

लग्नातील शब्दसंग्रह:
1. Procession -  मिरवणुक
2. Clarinet - सनई
3. Bride and Groom - वधू आणि वर
4. Vow -  प्रतिज्ञा
5. Wedding Pavilion - लग्न मंडप
6. Bridesmaids - लग्नातील करवली
7. Groomsmen -  एक मित्र अधिकृतीत्या वधू वराचे लग्नात उपस्थित असतो. 
8. Trousseau - वधूचा एकूण साज (कपडे)
9. Vermilion - शेंदूर
10. Ritual - विधी
11. Ceremony - सोहळा
12. Reception - स्वागतसमारंभ
13. Garland - हार

Thursday, March 31

मसाल्यांची नावे

1. Fennel  - बडीशोप
2. Bay leaf - तमालपत्र
3. Star Anise - चक्र फुल                            
4. Black pepper - मिरपूड
5. Black salt - काळे मीठ
6. Carom seeds - ओवा
7. Caraway seeds  - काळे जीरा
8. Cinnamon - दालचिनी
9. Coriander powder - धणे पावडर
10. Cumin seeds - जिरे
11. Curry leaves - कढीपत्त्याची पाने
12. Cloves - लवंग
13. Cardamom - वेलदोडा
14. Fenugreek - मेथी
15. Mustard seeds - मोहरी
16. Sesame seeds - तिळ
17. Poppy seeds - खसखस
18. Tamarind - चिंच
19. Saffron - केशर
20. Turmeric -  हळद

Monday, March 28

Words to Describe People

लोकांचे वर्णन करण्यासाठीचे 6 शब्द : 👬👪

1. Affectionate (खूप प्रेमळ) - someone who is very loving.

Example: My friend is very affectionate.
(उदाहरण: माझी मैत्रीण खूपच प्रेमळ आहे.)

2. Aggressive (a negative adjective) आक्रमक - someone who is physically or verbally threatening towards other people.

Example: I don't like aggressive people. I like people who are relaxed and calm.
(उदाहरण: मला आक्रमक लोक आवडत नाहीत. मला शांत आणि निवांत लोक आवडतात.)

3. Ambitious (महत्वकांक्षी) - an adjective used to describe a person who is keen to get on in life.

Example: He is very ambitious. He is hoping to be promoted soon.
(उदाहरण: तो खूप महत्वकांक्षी आहे. त्याला बढती मिळेल अशी आशा त्याला वाटत आहे.)

4. Anxious (चिंताक्रांत असलेला) - someone who worries a lot.

Example: His uncle is an anxious person. He worries far too much about things.
(उदाहरण: त्याचे काका एक चिंताक्रांत व्यक्ती आहेत. ते काही गोष्टींची फारच काळजी करतात.)

5. Artistic (कलाकौशल्य असलेला) - someone who is good at creative things, such as painting and drawing.

Example: His brother is very artistic. He is good at drawing.
(उदाहरण: त्याचा भाऊ कलाकार आहे. तो खूप छान चित्रे काढतो.)

6. Charismatic (लक्ष वेधून घेणारी आकर्षक व्यक्ती) - someone who attracts other people, and who is good at getting other people's attention.

Example: My friend is a charismatic chef.
(उदाहरण: माझा मित्र एक आकर्षक आचारी आहे.)

Friday, March 25

7 Messages to wish on Holi:


1. A true and caring relation doesn’t have to speak loud, a soft message is just enough to express the heartiest feelings. Enjoy the festival of Holi with lots of fun!
(एका खऱ्या आणि जपलेल्या नात्यामध्ये मोठ्याने गाजावाजा करण्याची काही गरज नाही, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक छोटासा संदेशदेखील पुरेसा आहे. भरपूर मजा करत होळीच्या सणाचा आनंद लुटा.)

2. May you have the a blessed Holi - more than what you have ever had!
May it be full of fun, joy and love.
May your life become as colorful as the festival itself.
Happy Holi!
(मागील सणांपेक्षा यावेळच्या होळीला तुमच्यावर पूर्वीपेक्षा अधिक कृपा होवो. ही होळी तुमच्यासाठी पूर्णपणे आनंददायी, प्रेम व मनोरंजनाची असो. या सणासारखेच तुमचे आयुष्यदेखील रंगीबेरंगी होवो. होळीच्या शुभेच्छा.)

3. On Holi, the festival of colors and joy, I want to thank you for all the love and smiles you’ve brought to my life. Happy Holi!
(होळीच्या या रंग आणि आनंददायी सणाच्या निमित्ताने आतापर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात आणलेल्या प्रेम आणि आनंदाच्या क्षणांबद्दल मी तुमचा आभारी आहे. होळीच्या शुभेच्छा!)

4. Wish you and your family
all the bright hues of life.
Have a colourful holi!
(तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा. रंगीबेरंगी होळीचा आनंद साजरा करा!)

5. Holi is the time to forget the bad and relish the good! May your life be full of colours and happiness. Happy Holi!
(वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!)

6. Holi is not just about colours and sweets. It also reminds us the eternal love of Krishna and Radha, and the stories of Narashima, Prahlada and Hiranyakashyapa. Wishing you all the blessings of Holi 2016.
(होळी फक्त रंग आणि गोडाधोडापुरती मर्यादित नाही. ती आपल्याला राधा-कृष्णाच्या अनंतकाळापासून असलेल्या प्रेमाची आणि तसेच नरसिंह, प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपाच्या कथांची आठवण देखील करून देते. 2016 च्या होळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!)

7. A touch of green I send to you.
A drop of blue to cool the hue.
A tinge of red for warmth
and
zest for a colorful HOLI!
Happy Holi!

(एक हिरवा स्पर्श मी तुला पाठविला आहे. रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठविला आहे. प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठविली आहे! होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!)